आम्ही विद्यार्थ्यांच्या त्यांच्या क्षमतांना ओळखण्यासाठी वातावरण निर्माण करतो त्यामुळे मुले स्वतः त्यांच्या विकासासाठी सज्ज होतात, ज्यामुळे शाळेतच नाही तर त्यांच्या आयुष्यातही ते 'प्रो-परफॉर्मर' बनतात.
"मानवी मूल्ये, संस्कार, खेळ, अनुभव आणि शालेय शिक्षण यांचा समतोल साधत प्रत्येक मुलाच्या सर्वांगीण विकासाचा भक्कम पाया तयार करणे व Future Ready पिढी घडवणे."
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविण्यासाठी खेळ, अनुभव आधारित शिक्षण, गाणी, गोष्टी, संवाद, नाटक, आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून एक भविष्य वेधी अनुभव केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची जडण घडण करणे.
आमची ओळख
HappiEdge Academy ही सिन्नरमधील एक आधुनिक बाल विकास संस्था आहे, जी पारंपरिक पाठांतर पद्धतीला फाटा देऊन खेळ, अनुभव आणि कृतीतून शिक्षण देण्यावर विश्वास ठेवते. आमचं पहिलं पाऊल आहे HappiEdge Jr. — ३ ते १२ वयोगटातील मुलांसाठीचा रोजचा Junior Campus प्रोग्राम.
याच पायावर आम्ही टप्प्याटप्प्याने मोठ्या वयोगटासाठी आणि शाळांसाठी मूल्य व नेतृत्व विकासाचे विशेष कार्यक्रम घडवत आहोत.
३ ते १२ वयोगटातील मुलांसाठीचा एक नाविन्यपूर्ण प्रोग्राम. यामध्ये खेळ आणि प्रयोगांच्या माध्यमातून गणित, विज्ञान आणि भाषा विषयांची गोडी निर्माण केली जाते.
शालेय विद्यार्थ्यांसाठी नेतृत्व विकास (Leadership Development) आणि मूल्यवर्धन कार्यक्रम, जे त्यांना भविष्यातील आव्हानांसाठी सक्षम बनवतात.
केवळ पुस्तकी ज्ञान नाही, तर प्रत्यक्ष कृतीतून शिकण्यावर भर.
अभ्यासासोबतच शारीरिक व व्यक्तिमत्त्व विकासाला (Holistic Development) प्राधान्य.
आधुनिक शैक्षणिक तंत्रज्ञान आणि पारंपरिक मूल्यांचा अचूक मेळ.
वय ३ ते १२ — एक निरंतर प्रवास
या वयात मुलांचा मेंदू ९०% विकसित होतो. त्यामुळे आम्ही पाठांतराला फाटा देऊन खेळांतून आणि कृतीद्वारे मुलांचा पाया भक्कम करतो.
Early Riser साठी मुख्य Activities: शारीरिक विकास, व मोटर स्किल्स साठी खेळ, योग आणि व्यायाम तसेच Creativity आणि बौद्धिक विकासासाठी अक्षरे, संख्या, आकार, रंग व भाषा ओळख आणि प्राथमिक संभाषण कौशल्य.
हा वयोगट शाळा आणि बाहेरील जग समजायला लागतो. येथे आम्ही मुलांचे गणित, सायन्स आणि भाषिक कौशल्य अगदी प्रगत पातळीवर नेतो.
Risers साठी मुख्य भर: तार्किक क्षमता, स्टेज डेअरिंग आणि प्रगत व्यवहारज्ञान.
हा टप्पा अभ्यासातील गांभीर्य आणि नेतृत्व कौशल्ये यांचा संगम असेल.
हा अंतिम टप्पा मुलांना खऱ्या जगासाठी सज्ज करेल.
योग, प्राणायाम व ध्यान व हलके व्यायाम ज्यामुळे शाळेचा थकवा दूर होतो.
गंमतीदार गणित कोडे, गणिताचे गेम्स, वेदीक गणित आणि हाताने प्रत्यक्ष प्रयोग करून शिकण्याची प्रवृत्ती.
पाणी/खाऊची सुट्टी, मित्रांशी संवाद, आणि टीम गेम्स व शिष्टाचार.
पब्लिक स्पीकिंग, इंग्रजी संवाद सुधारणा, ड्रामा (अभिनय), डान्स, किंवा कॅमेरासमोर बोलणे.
"HappiEdge Junior Campus मध्ये घालवल्याने मुलांच्या अभ्यासाचे नुकसान होईल का?" — या पालकांच्या सर्वात मोठ्या काळजीला आमचे वैज्ञानिक उत्तर:
खाली फॉर्म भरा — आमचा टीम लवकरच आपल्याशी संपर्क साधेल आणि सर्व प्रश्नांची उत्तरे देईल.
🔒 आपली माहिती पूर्णपणे सुरक्षित आहे. Spam नाही.
आपली चौकशी यशस्वीरीत्या पाठवली गेली आहे. HappiEdge टीम लवकरच आपल्याशी संपर्क साधेल!
WhatsApp वर थेट बोला